आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील या गावात अनेक वर्षे राहिले महात्मा गांधी, पाहा खोली, टेलीफोन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर बापूची बैठी खोली, टेलिफोन, खाली वेस्टर्न टॉयलेट आणि आटाचक्की - Divya Marathi
वर बापूची बैठी खोली, टेलिफोन, खाली वेस्टर्न टॉयलेट आणि आटाचक्की
सेवाग्राम (वर्धा)- महात्मा गांधी वर्ध्यातील सेवाग्राममध्ये अनेक वर्षे राहिले. येथील 'बापू कुटी आश्रम' हा देशातील एकमेव असा आश्रम आहे जेथे बापूजींच्या अनेक वस्तू जशाच्या तशा आहेत. म्हणजेच अनेक वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेल्यानंतरही त्या वस्तू नीटनेटक्या स्थितीत तशाच आहेत. 30 जानेवारी 1948 रोजी बापूजींची हत्या झाली नसती तर दोन दिवसानी वर्ध्यात येणार होते. काण त्यांचे रेल्वेचे तिकिटही बुक करण्यात आले होते.
वर्ध्यात केव्हा राहायला आले होते महात्मा...
गांधींजी 1934 मध्ये वर्धा येथे आले होते. प्रथम ते शहरातील मध्यवस्तीतील मगनवाडीत राहायचे. त्यानंतर ते 1936 मध्ये सेवाग्राम राहयला गेले. हे सेवाग्राम वर्धा शहरापासून 8 किलोमीटर दूर आहे. सेवाग्राममध्ये सुमारे 300 एकरावर आश्रम पसरला आहे. हा आश्रम आता बापू कुटी नावाने ओळखला जातो. आश्रमात लहान-मोठ्या कच्च्या झोपड्या आहेत. यात बापू आणि त्यांचे सहकारी राहत असत. स्वंयपाक घर, राहणे-झोपणे, ऑफिस, बैठक व्यवस्था आदींसाठी वेगवेगळ्या कॉटेजचा वापर केला जात असत. बापूंच्या आजच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी तेथील रिसर्च स्कॉलर भवानीशंकर मिश्र यांनी घेतलेली 'बापू कुटी आश्रम'तील काही फोटो घेऊन आलो आहे.
एका संकल्पाच्या कारणामुळे वर्ध्यात राहायला आले होते गांधी-
महात्मा गांधी फक्त एक संकल्प केल्यामुळे वर्ध्यात राहायला आले होते. 1930 साली साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढल्यानंतर गांधींजीनी हा संकल्प केला होता की, साबरमती आश्रमात ते त्यावेळी परततील जेव्हा इंग्रजापासून भारताला स्वतंत्र्य मिळवून देईन. यानंतर गांधींजी तीन वर्ष जेल व आंदोलनात सहभागी झाले. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यामुळे ते साबरमतीला परतले नाहीत. त्यावेळी त्यांनी मध्यभारतात कुठे तरी आश्रमात राहण्याचा विचार सुरु केला. पुढे जमनालाल बजाज यांच्या आग्रहास्तव बापू वर्धा येथे राहायला आले.

लोकांना फेरबदल केलेले नाही आवडत-
आश्रमासोबत जोडलेल्या लोकांना गांधींजीच्या वस्तूबाबत अथवा तेथील फेरबदल केलेले अजिबात आवडत नाहीत. सेवाग्राम आश्रमाशिवाय वर्धा येथे सुमारे 26 जागा आहेत जेथे गांधींचा संबंध आला होता. महाराष्ट्र सरकारने यासाठी एक योजना सुरू केली आहे. सरकारचा प्रयत्न आहे की बापूशी जोडलेला हा सेवाग्राम आश्रमम देश-विदेशातील नागरिकांचे पर्यटनस्थळ बनावे. सरकार यासाठी आश्रमाजवळ एक पार्क विकसित करीत आहे.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, बापूशी संबंधित आश्रमातील निवडक फोटोज...