आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खादी स्टोअर्सची कमाई २० टक्के, विणकरांचे हालच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एक नामांकित फॅशन ब्रँड बनलेली महात्मा गांधी यांची खादी हॉलीवूडपर्यंत पोहोचली असली तरी याचा मुख्य फायदा ब्रँडेड दुकानदारांनाच होत आहे. सुमारे सहा टक्के दराने वाढत असलेल्या खादीच्या विक्रीतून दुकानदारांना २० टक्के नफा मिळत आहे. मात्र, खादी विणकरांची मजुरी (एका दिवसाची सरासरी कमाई १५० रुपये) मनरेगापेक्षाही कमी आहे. १८४६ पासून पुण्यात जनता खादी भंडार चालवत असलेले श्रीनिवास श्याम जन्नू यांनी सांगितल्यानुसार, सुरुवातीला हा व्यवसाय फक्त धोतर, कुर्ता आणि चादरीपुरताच मर्यादित होता. मात्र, आता बालकांपासून ते वयोवृद्धांसाठीसुद्धा उत्पादने तयार केली जात आहे. दर महिन्याला १० लाखांपर्यंतचा व्यवसाय करत असलेले जन्नू यांच्या दुकानात ४०० पासून ते ८ हजार रुपये किमतीपर्यंतची उत्पादने उपलब्ध आहेत. सध्या खादीची मागणी वाढली असून २० टक्यांपर्यंत सरासरी नफा मिळत आहे. दुसरीकडे, ३० वर्षीय कुंठेश्वर परमार हे उज्जैनमधील ताजपुरच्या पाेली वस्त्र केंद्रात विणकर आहेत. दिवसातील सहा तासांत ते ७ ते १० मीटर कापड तयार करतात. त्यांना मीटरभर कापडासाठी २० रुपयांची मजुरी मिळते. यातूनही मीटरमागे पाच रुपयांची कपात केली जाते आणि ते तीन वर्षांनंतर दिले जातात.