मुंबई- अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर काॅ. गाेविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित काही लाेकांवर संशय व्यक्त केला जात असून यापैकी दाेघांना अटकही करण्यात अालेली अाहे. या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवरच बंदी घालण्याची मागणी होत आहे. मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मात्र एका संस्थेवर अशाप्रकारे बंदी घालण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
‘सनातन संस्थेवर बंदी घालू नये. कारण अशी बंदी लोकशाहीला मारक आहे. या संस्थेशी संबंधित काही जण दोषी असतील तर त्यांना जरूर शिक्षा करावी. मात्र, संस्थेवर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही. एखाद्या संस्थेवर बंदी घातल्यास ती पुन्हा जोमाने छुप्या मार्गाने काम करते, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे बंदी हा पर्याय ठरुच शकत नाही,’ असे परखड मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
काॅंग्रेसला मात्र हवीय बंदी
राज्यातील देशपातळीवर काॅंग्रेसचे नेते मात्र सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी अाग्रही अाहेत. विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी या मागणीचा नुकताच पुनरुच्चारही केलेला अाहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)