आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahauti Seat Distribution Contro Says Ramdas Athawle

निवडणुकांसाठी महायुतीचे जागा वाटप लवकर करावे, आठवले यांचा पुनरुच्चार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभेसाठी पाच, तर विधानसभेसाठी 35 जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात. महायुतीचे जागावाटप उन्हाळ्यातच व्हायला हवे होते. उशीर झाला असला तरी आता जागांचे वाटप लवकर व्हावे, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

रामटेक, लातूर, दक्षिण मुंबई, कल्याण आणि पुणे अशा सहा जागा लोकसभेसाठी मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. आम्हाला ज्या जागा मिळतील त्यातील किमान दोन जागा या हमखास निवडून येणाºया असाव्यात. तसेच विधानसभेच्या किमान 35 जागा आम्हाला मिळावयास हव्यात. केवळ शिवसेनेनेच नव्हे, तर भाजपनेही त्यांच्या कोट्यातील जागा आम्हाला देऊन जागा जिंकण्यासाठी मदत करावी. जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे, मुंडे यांच्याशी चर्चा करू. चौथा भिडू नको असे आपणच सर्वप्रथम म्हटले होते. शिवसेनेने टाळीसाठी हात पुढे केल्यामुळे मी मनसेबाबत वक्तव्य केले होते. आता उद्धव ठाकरे यांनी विषय संपला असल्याचे सांगितल्याने चौथा भिडू येणार नाही हे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.

उदयनराजेंनी रिपाइंतर्फे निवडणुक लढवावी
उदनयराजे भोसले यांना आम्ही रिपाइंतर्फे निवडणुक लढवावी असे आवाहन केले आहे. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना घेऊन राज्य केले. त्यांच्या वारसदाराला घेऊन आम्ही तोच वारसा पुढे नेऊ इच्छित आहोत.
शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही कोलांटउड्या का मारता विचारताच ते म्हणाले, हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमच्यात काही विषयांवर मतभेद आहेत, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवरून हटवायचे असेल तर एकत्र येणे आवश्यक असल्याने आम्ही किमान समान कार्यक्रमावर महायुती केली आहे.