आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahavitran Not Accept Government 20 Percent Rate Cut In Electricity

वीज दरांत 20 टक्के कपातीचा सरकारचा निर्णय महावितरणला मान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वीज दरांत 20 टक्के कपातीचा सरकारचा निर्णय महावितरणला मान्य नाही. वीज नियामक आयोगाकडे आम्ही यापूर्वीच 10 टक्के दरवाढीची मागणी केली असून त्यासाठी आग्रही असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
दरवाढीचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर न झाल्यास आगामी वर्षात खर्चाची तोंडमिळवणी करता येणार नाही. कंपनीच्या व्यवहारांना त्याचा फटका बसेल, असा इशारा महावितरणने दिला. महावितरणच्या 2014 व 15 या वर्षांसाठी प्रत्येकी 10-10 टक्के दरवाढीच्या प्रस्तावावर आयोगाकडे अद्याप निर्णय दिलेला नाही. यामुळे तो पुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे कंपनीच्या अधिकार्‍याने सांगितले.