आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताकद नसलेल्या प्रभागात आम्हाला जागा - आठवले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेने आम्हाला 29 जागा दिल्या ख-या; परंतु त्यापैकी अनेक जागांवर शिवसेना-भाजपची ताकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी निवडून येणे कठीण आहे, अशी कबुली खुद्द रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीच बुधवारी दिली. आम्हाला चुकीच्या जागा दिल्या आहेत, परंतु आघाडीला सत्तेपासून दूर ठेवायचे असल्याने आम्ही जास्त ताणून धरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशभरात रिपाइंतर्फे लढवण्यात येणा-या निवडणुकांची माहिती देण्यासाठी रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 250 जागा, पंजाब राज्यात 4 जागा, मणिपूर राज्यात 7 जागा, गोवा राज्यात 10 जागा, उत्तराखंड राज्यात 25 विधानसभेच्या जागा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी आपण स्वत: उत्तराखंड येथे तर 30 आणि 31 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश येथे जाणार आहोत.
दलित जनता आमच्याच पाठिशी
बसपचे विलास गरुड यांनी रिपाइं लुटारुंची संघटना असल्याच्या आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले की, दलित जनता आमच्या पाठिशी असल्यानेच अन्य नेत्यांना पोटदुखी सुरु झाली आहे, म्हणूनच आमच्यावर असे आरोप केले जात आहेत.
रिपाइं ही लुटारूंची संघटना - गरुड