आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीचीही आता समन्वयासाठी समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या धर्तीवर विरोधी पक्ष भाजप, शिवसेना व रिपाइं यांचीही समन्वय समिती असेल. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा व पुढील निवडणुका एकत्र लढवल्या जातील, असे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मुंडे यांनी ही माहिती दिली.

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे समितीत असतील, असे मुंडे यांनी जाहीर केले.

बाळासाहेबांचे नाव का नको : इंदिरा गांधी, यशवंतरावांची नावे दिली जातात. मग बाळासाहेब ठाकरे यांचे नाव रेसकोर्सवरील थीम पार्कला का नको, असे मुंडे म्हणाले.

एलबीटीला विरोध कायम
भाजपने एलबीटी लागू करण्यास असलेला विरोध कायम ठेवला आहे. व्यापार्‍यांना आपला पाठिंबा असून, याआधी व्हॅट लागू करताना सरकारने नवा कर लावणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सरकारने व्यापार्‍यांशी चर्चा करावी. आपणही काही पर्याय सुचवून, असे मुंडे यांनी म्हटले आहे.