आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahayuti News In Marathi, RPI, Shiv Sena, Divya Marathi

विधानसभेसाठी आज महायुतीचे जागावाटपाची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीची मुंबईत सोमवारी जागावाटपाची बैठक होत असून रिपाइं, स्वाभिमानी, शिवसंग्राम आणि ‘रासप’ नेत्यांच्या जागांच्या मागणीचा आकडा किमान 50 जागांवर जाणार असल्याने काँग्रेस-राष्‍ट्रवादीप्रमाणे महायुतीतसुद्धा जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ‘रिपाइं’ने आपल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यात 50 नावे असून बैठकीत किमान 30 मतदारसंघांची मागणी रामदास आठवले करण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई या विभागांतील मतदारसंघांवर ‘रिपाइं’चा प्रामुख्याने डोळा आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तिकीट मागणीसंदर्भात 65 अर्ज आले आहेत. आम्ही जागांवर अडून राहणार नाही. मात्र, फरपटही करून घेणार नाही, असे स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील मतदारसंघांत स्वाभिमानीची प्रामुख्याने मागणी असणार आहे.