आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahayuti Seat Distribution News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना 151 तर भाजपाला 119 जागा; युती टिकवण्याचा हा शेवटचा प्रयत्न - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा मिटवण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 119 जागा देण्याचा प्रस्ताव भाजपा समोर ठेवला आहे. हा फॉर्म्यूला म्हणजे युती टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न आहे. मात्र जर भाजपाला हे मान्य नसेल तर आमच्या याद्या तयार आहेत, आम्ही कोणत्याही क्षणी निर्णय जाहिर करू असे सांगायलाही ते विसरले नाही. ते रंगशारदा येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते.
युती टिकली पाहिजे ही माझी मनापासूनची इच्छा आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही जागा सोडणार नाही. महाराष्ट्रात मला कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी. मला घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी सत्ता हवी आहे, असेही ते म्हणाले.

जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आम्ही माघार घेत आहोत. जागा वाटपाचा निर्णय हा माझ्यासाठी कटुतेचा क्षण आहे. तरीही शिवसेना 151, भाजप 119, तर मित्र पक्षांना 18 असा नवा फॉर्म्यूला आम्ही भाजपसमोर ठेवला आहे. मात्र ह्या जागा आम्ही ठरवणार कोणत्या द्यायच्या ते. जर हा ही पर्याय त्यांना मान्य नसेल तर आम्ही एकट्याने लढण्यास समर्थ आहोत असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.