आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahayuti Small Parties Meeting At Majestic, Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीचे भवितव्य काय?: सर्वांना सोबत घेऊनच निवडणुकीला सामोरे जावू- भाजप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना-भाजपच्या युतीतून आज सायंकाळी आम्ही तीन घटकपक्ष बाहेर पडणार असल्याचेेे जाहीर करताच भाजप व शिवसेनेची धावपळ उडाली. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी सर्व जणांना सोबत घेऊन जाऊ. ते आमचे विश्वासू सहकारी आहेत. जागावाटपात त्यांचाही सन्मान राखला जाईल, असे सांगत त्यांच्याशिवाय युती होणार नाही असे सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना सोबत घेऊन व जागावाटपाबाबत मार्ग काढू असे सांगितले. त्याआधी घटकपक्षांचे नेते राजू शेट्टी व महादेव जानकर यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली. तसेच मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी मला तुमची साथ हवी आहे. माझ्यापरीने मी खूप प्रयत्न केला. 150 जागांपेक्षा मी एकही कमी जागा लढविणार नाही. त्याऐवजी मी तुमच्यासाठी काय काय करू शकतो. तुम्ही जे मागाल त्यासाठी मी तयार आहे अशी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर हे नेते भाजप नेत्यांच्या भेटीला गेले आहेत.
भाजप-सेना घटकपक्षांना फारसे महत्त्व देत नसल्याने व केवळ 7 जागाच देऊ केल्याने आम्ही महायुतीतून बाहेर पडत असल्याची माहिती रासपचे प्रमुख महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी दिली होती. भाजप-शिवसेनेने आम्हा छोट्या पक्षांचा गोड बोलून वापर करून घेतला व आता शेवटी पाठीत गंजीर खुपसला असा आरोप जानकर यांनी केला तर, भाजपने आपल्या जागा वाढवून घेण्याकरिता आम्हाला खेळवत राहिले असा आरोप खोत यांनी केला.
शिवसेना-भाजपने जागावाटपांत महायुतीतील घटकपक्षांना केवळ 7 च जागा देऊ केल्याने नाराज झालेल्या घटकपक्षांची आज सकाळी 11 वाजता मुंबईत बैठक झाली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर व शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे हे हजर होते. या बैठकीत जागावाटपाबाबत व सेना भाजपच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा केल्यानंतर या तीन पक्षांच्या नेत्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांनी दिली. आज सायंकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करू असेही त्यांनी सांगितले.
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना खोत म्हणाले, आम्ही महायुतीतून बाहेर पडत आहोत. आज सायंकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करू. त्याचबरोबर आम्ही तीन घटकपक्ष आगामी निवडणुकीला एकत्र सामोरे जाऊ. त्याची पहिली यादी आज सायंकाळी आम्ही सादर करू, असेही खोत यांनी सांगितले. खोत म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याने आम्हाला महायुतीत आणले. पण त्यांच्या निधनानंतर महायुतीला कोणीही वाली राहिला नव्हता. लोकसभेत आमच्या साथीने जोरदार यश मिळविल्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली. भाजप-सेनेचे जागावाटप पूर्ण झाले आहे. त्यांनी आम्हाला केवळ गुंतवून ठेवले असा आरोपही खोत यांनी केला. मात्र आम्ही जनतेसमोर जावू व या लोकांचा खरा चेहरा कोणता आहे जे दाखवून देऊ असेही खोत यांनी सांगितले.

महायुतीतील आणखी एक घटकपक्ष रामदास आठवले हे मात्र बैठकीला उपस्थित नव्हते. आठवले यांनी कितीही कमी जागा मिळाल्या तरी युतीतच राहण्याचा विचार व्यक्त केला आहे. निवडणूक लढविल्या तर स्वत:च्या बळावर जिंकणे कठीण आहे त्यामुळे जागांपेक्षा सत्तेत वाटा मिळावा, असे आठवलेंना वाटत आहे. त्यामुळे ते भाजप-सेनेतच राहणार आहेत.

जागावाटपावरून भाजप व शिवसेनेत सुरू असलेली तेढ शिवसेनेने चर्चेसाठी पुढाकार घेतल्याने मंगळवारी दुपारीच मिटली. मात्र अंतिम फॉर्म्युल्यानुसार कमी जागा पदरी पडत असल्याने नाराज असलेल्या घटक पक्षांसोबत या पक्षाच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. मात्र, त्यात भाजप-सेनेने केवळ 7 जागा देऊ केल्याने घटकपक्ष नाराज झाले व बैठकीतून बाहेर निघून गेले. त्यामुळे महायुतीबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता.
लोकनेता गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर केवळ तीन महिन्यांत तुटली महायुती... वाचा पुढे...