आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभजनचा आरोप- आम्रपाली ग्रुपने WC विजेत्या संघाला दिलेले वचन तोडले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन आणि धोनी (फाईल फोटो). आम्रपाली बिल्डर्स ग्रुपसोबतची भागीदारी सोडल्यामुळे हरभजन सिंगने कर्णधार एम एस धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. - Divya Marathi
हरभजन आणि धोनी (फाईल फोटो). आम्रपाली बिल्डर्स ग्रुपसोबतची भागीदारी सोडल्यामुळे हरभजन सिंगने कर्णधार एम एस धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई- आम्रपाली बिल्डर्स ग्रुपसोबतची भागीदारी सोडल्यामुळे हरभजन सिंगने कर्णधार एम एस धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. हरभजनने शनिवारी एक टि्वट करून म्हटले आहे की, आम्रपाली ग्रुपने 2011 साली वर्ल्ड कप जिंकणा-या टीम इंडियातील खेळाडूंना एक एक व्हिला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले गेले नाही. भारतीय संघाचा कर्णधार धोनीने नुकतेच आम्रपाली कंपनीसोबतचे आपली सर्व भागीदारी व करार तोडले आहे. आम्रपाली कंपनीवर आरोप आहे की, त्यांनी सामान्य लोकांकडून भरमसाठ पैसे गोळा केले मात्र त्यांना घरे, फ्लॅट दिले नाहीते.
हरभजनच्या टि्वटनंतर आम्रपालीच्या सीएमडीने काय म्हटले?
- कंपनीचे सीएमडी अनिल शर्मा यांनी सांगितले की, ''वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी 11 क्रिकेटपट्टूंना एक-एक व्हिला देण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर कोणीही काहीही संपर्क साधला नाही. आजही त्या खेळाडूच्या नावाने ते व्हिला अलॉटेड आहेत. आम्रपाली ग्रीन व्हॅलीत बनलेल्या हे बंगले तयार आहेत. त्या खेळाडूंनी प्रक्रिया पूर्ण करावी व ते बंगले ताब्यात घ्यावेत.
- आतापर्यंत आम्हाला कोणीही संपर्क साधला नाही. हे काही वस्तू नाही जे तुम्ही त्यांना उचलून देऊ शकता. हे व्हिला देण्याची एक प्रक्रिया आहे. ते (हरभजन) आज वक्तव्य करीत आहेत. ते यापूर्वी काहीच का बोलले नाहीत. ते आमच्यावर आरोप करू शकत नाहीत. आम्ही दिलेले वचन तोडलेले नाही.
- '' आम्ही महेंद्र सिंह धोनी आणि वर्ल्ड कप जिंकणा-या टीममधील सर्व खेळाडूंना बंगले अलॉट केले होते. अलॉटमेंटसाठी फ्लॅट तयार आहेत.
- ''व्हिला जाहीर करणे प्रसिद्धी स्टंट कधी बनतो? ते सेलिब्रिटी आहेत, क्रिकेट खेळतात. आम्ही त्यांना कसे संपर्क करू शकतो. त्यांना बंगले हवे आहेत तर त्यांनी त्यांचे किमान प्रतिनिधी तरी पाठवावेत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू पण त्यांनी आरोप करणे थांबवावे.''
ग्रुपच्या कंपनीत संचालक आहे धोनीची पत्नी
- आम्रपाली ग्रुपचे डायरेक्टर अनिल शर्मा यांनी शुक्रवार एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की, धोनीने आता आमच्या कंपनीचे ब्रॅंड अॅम्बेसडर राहावे असे आम्हाला वाटत नाही.
- शर्माने ग्रुपची कंपनी आम्रपाली माही डेवलपर्स या कंपनीला एक चॅरिटेबल कंपनी सांगितले.
- या कंपनीत धोनीती पत्नी साक्षीची 25% भागीदारी आहे. ती त्या कंपनीची संचालक पण आहे.
- शर्माने सांगितले की, ते आता आम्रपाली माही डेवलपर्स कंपनीला या आर्थिक वर्षात बंद करणार आहेत.
- शर्माने सांगितले की, ज्यांनी ज्यांनी आमच्या कंपनीत पैसे टाकले आहेत त्या सर्वांना घर जरूर मिळेल.
- आमचे राहिलेले अर्धवट प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
काय आहे प्रकरण?
- लोकांचे म्हणणे आहे की, 2009 मध्ये लाँच झालेल्या नोएडा सेक्टर-45 मधील या प्रोजेक्टचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
- यातील 1000 पैकी 800 फ्लॅट्समध्ये लोकांनी राहणे सुरु केले आहे.
- मात्र, आताही अनेक इमारतीतील सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल काम पूर्ण झालेले नाही.
- लोकांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला याबाबत तक्रार केली. मात्र त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतलेले नाही.
- यानंतर त्यांनी मागील महिन्यात धोनीच्या टि्वटर खात्यावर #AmrapaliMisuseDhoni हॅशटॅगसोबत टॅगिंग सुरु केले.
पुढे वाचा, हरभजनचे टि्वट आणि ग्राहकांनी धोनीबाबत सोशल मिडियात काय म्हटले...
बातम्या आणखी आहेत...