आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटसृष्टीतही राजकीय लढाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘मिक्टा’ सोहळा मराठीत चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. मात्र मांजरेकर आता मनसेमार्फत लोकसभा निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे शिवसेनेने त्यांच्या ‘मिक्टा’चे महत्त्व कमी करण्यासाठी ‘इम्फ’चा पर्याय समोर आणला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच या पुरस्कार सोहळ्याच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.

कलाकारांचे सर्वच राजकीय पक्षांशी मधुर संबंध असतात. मात्र मनसेच्या स्थापनेनंतर अनेक कलावंतांनी त्यांच्या चित्रपटसेनेत जाहीररीत्या प्रवेश केला. तसे काही अभिनेते शिवसेनेच्या चित्रपटसेनेतही आहेत. महेश मांजरेकर यांचे यापूर्वी शिवसेना व मनसेत चांगले संबंध होते. मात्र मांजरेकरांनी मनसेची उमेदवारी घेऊन शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनाच आव्हान दिल्याने मात्र उद्धव यांनी मांजरेकरांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे.

शार्दूल क्रिएशन्स आणि सीएमए फाउंडेशनने जून महिन्यात मॉरिशस येथे या आपल्या पहिल्या इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. आयोजनकर्ते शिरीष राणे या त्यासाठी पार्टनर शोधत होते. शिवसेनेचे आदेश बांदेकर यांना ही माहिती कळताच त्यांना ‘मिक्टाचे महत्त्व कमी करण्यासाठी हा कार्यक्रम आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनाही तयार केले.

वीरेंद्र रामधन यांच्याकडून हिंदुत्वाचा आधार
मॉरिशस येथील हिंदू हाऊसचे वीरेंद्र रामधन विशेष निमंत्रित होते. रामधन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची प्रशंसा करीत उद्धव ठाकरेही तसेच काम करीत असल्याचा उल्लेख केला. केवळ रामधनच नव्हे तर अन्य वक्त्यांनीही हिंदुत्वाच्या भूमिकेचे समर्थन यावेळी केले. उद्धव ठाकरे यांनीही या पुरस्काराची ट्रॉफी ऑस्करच्या तोडीची व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.