आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahrashtra Vidhansabha Election 2014 Rashrtavadi Congress News In Marathi

अपक्ष आमदार प्रत्यक्ष, तर एकाचा मोबाइलवरून राष्ट्रवादीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - १२ अपक्ष आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोमवारी भलताच रंजक ठरला. १२ पैकी अपक्ष आमदारांनी अजित पवार, सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दिलीप सोपलांनी मोबाइलवरून आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे पवारांना सांिगतले, तर दिलीप लांडे, रवी राणा लक्ष्मण जगताप यांनी ऐन प्रवेशावेळी दांडी मारली.
काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचून आघाडीतील मित्रपक्षाला जशास तसे उत्तर दिले. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मान िसंगराव नाईक (शिराळा), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), मकरंद पाटील (वाई), रमेश थोरात (दौंड), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), सुरेश देशमुख (वर्धा), शरद गािवत (नवापूर), कृषिभूषण साहेबराव पाटील (अमळनेर) प्रवेश देण्यात आला.
काँग्रेसचे माजी आमदार राजन तेली तसेच काका कुडाळकर, मनोज नाईक, उमेश कोरगावकर यांच्यासह सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या लोकप्रति निधींना या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. लांडे, राणा देशमुख हे बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊनच राष्ट्रवादी प्रवेश करायचा की नाही, हे ठरवणार असल्याचे समजते.
काँग्रेस आघाडीचे जागा वाटप अजून निच्छीत झालेले नाही. याविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, आमचीआजही काँग्रेसकडे १४४ जागांची मागणी आहे. मात्र आता चेंडू वरीष्ठांच्या कोर्टात गेला आहे. दिल्लीत आमचे वरीष्ठ नेते शरद पवार, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल.अजित पवार, सुनील तटकरे, भुजबळ यांच्या उपस्थितीत आठ अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
चिंतेचे विषय डोके वर काढतायेत:
एकूणचदेशभरातील परिस्थितीचा विचार करता केंद्रातील सरकार बदलल्यानंतर हा देश एकसंध ठेवण्याची भाषा बोलण्याऐवजी अनेकजण लहान घटकांना चिंता वाटावी अशी वक्तव्ये करण्यामध्ये पुढे पुढे येत आहेत. मात्र, सामाजिक ऐक्याच्या बाबतीत राष्ट्रवादी तडजोड करणार नाही, असेही ते म्हणाले.
तो अधिकार नारायण राणेंना:
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नारायण राणे यांनी जे मत प्रदर्शित केले आहे ते महत्त्वाचे आहे. कारण ते त्या पक्षात होते. त्या पक्षाचे ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे. त्यांना शिवसेनेतील कामाची पद्धत माहिती असल्याने त्याबाबत मत व्यक्त करण्याचा त्यांना अधिकारच आहे असे पवार म्हणाले.