आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Main 4 Charectors Behind Breaking Alliences In Maharashtra

युती-आघाडी घटस्फोट नाट्यातील 4 प्रमुख चेहरे, वाचा का झाले BREAKUP

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हे छायाचित्र शिवसेना-भाजप युतीतील चांगल्या दिवसांमधील आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले होते, त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.)

मुंबई/नवी दिल्ली - महाराष्ट्रात गुरुवारी काही तासांतच दोन मोठ्या राजकीय आघाड्यांचा शेवट झाला. आधी हिंदुत्वाच्या मुद्यावर गळ्यात गळा घातलेल्या भाजप-शिवसेनेने 25 वर्षांची युती तोडली. तर, धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हातात हात घेतलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीनेही 15 वर्षांची मैत्री एका झटक्यात तोडली. महाभारतात जसे एकाच वंशातील लोकांमध्ये युद्ध झाले, त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातही एक नवे महायुद्ध सुरू झाले आहे. चार पक्ष या महायुद्धात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत.

राजकीय तज्ज्ञांच्या मते आता यांनी आघाड्या तोडल्या असल्या तरी, निवडणउकीनंतर नवीन समीकरणे जुळवण्यासाठी किंवा एकमेकाला आपल्याबरोबर खेचण्यासाठी चांगलाच घोडेबाजार रंगणार आहे. महाराष्ट्राची निवडणूक आता पंचरंगी होण्याची शक्यता आहे.

दोन संसार मोडले, ही आहेत 4 प्रमुख पात्रे

काँग्रेस v/s राष्ट्रवादी

पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रसेला चव्हाण यांचा विरोध होता. राष्ट्रवादीच्या अटी मान्य केल्या तर, राज्यात पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी पक्षाला पटवून दिले.
अजित पवार : राज्याचे उपमुख्यमंत्री. शरद पवार यांचे पुतणे. काँग्रेस विरोधी वातावरणाचा अंदाज आल्याने स्वतंत्र लढण्याचा त्यांचा निर्णय होता. वर्षबरापासून त्यांनी काँग्रेसविरोधाचा विडा उचलला होता.

शिवसेना v/s भाजप

देवेंद्र फडणवीस : भाजपचे प्रदेशाध्यक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांचे नीकटवर्तीय. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजय मिळवल्यानंतरही राज्यात शिवसेनेचा छोटा भाऊ बनून राहणे त्यांना मान्य नव्हते.
आदित्य ठाकरे : उद्धव ठाकरे यांचे पुत्र. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण केली. त्यानेच गुजरात लॉबी विरुद्ध मराठा लॉबीचे वातावरण तयार केले.
काय घडणार...
- शिवसेना उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपतर्फे गडकरी यांचे नाव समोर करण्यात येऊ शकते.
- निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळेच एकमेकांवर धोका केल्याचा आरोप लावतील. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा हेच एकमेकांच्या गळ्यात गळे घालणार, ही शक्यतादेखिल अधिक आहे.

- केंद्रातून शिवसेना सरकारमधून बाहेर पडू शकते. धार्मिक मुद्दा किंवा भ्रष्टाचाराऐवजी शिवसेना निवडणुकीत मराठा कार्ड समोर करू शकते.
पुढील स्लाइडवर क्लीक करून वाचा, द ग्रेट इंडियन पॉलिटिकल थिएटर; महाराष्ट्र शो