आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पॉट फिक्सिंगमधील मुख्य बुकी शोभन मेहता गोव्यात जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी फरार झालेला मुख्य बुकी शोभन मेहता याला पोलिसांनी गोवा येथून शुक्रवारी अटक केली. त्यामुळे या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 17 झाली आहे.


आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात आल्यानंतर अटकेत असलेल्या बुकींच्या चौकशीत मेहताचे नाव समोर आले होते. अटकेच्या शक्यतेने तो फरार झाला होता. मेहता कुटुंबीयांसह गोव्यात एका हॉटेलात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून मुंबईत आणले. मेहताचे अटकेत असलेल्या बुकींशी काय संबंध आहेत याची चौकशी पोलिस करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याआधी मेहता याला 2005 मध्ये बेटिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच त्याचे मुंबई, जयपूर, चेन्नई आणि कोलकाता येथे जाळे असल्याचेही निष्पन्न झाले होते.