आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: आग लागलेली गोकूळ निवास इमारत कोसळली, एक ठार, तर दोन जणांना वाचवण्‍यात यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतल्या काळबादेवी परिसरातील जय हनुमान गल्लीतील भीषन आग लागलेली गोकुळ निवास इमारत कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 16 गाड्या रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अग्नीशमन दलाच्या मुख्‍य अधिकाऱ्यासह तीन जण जखमी झाले आहेत. दोन लोकांना वाचवण्‍यात आले आहे.
संध्याकाळी 5.45 मिनिटांच्या सुमारास गोकुळ निवासाच्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती सुत्रांनी दिली. हा परिसर अतिशय गजबजलेला असल्याने अग्नीशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी जाण्यास जरा उशीर झाला. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्याचे नाव सुनिल नेत्रेकर असल्याचे समजते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चार मजल्यांच्या या इमारतीतील तीन मजले रहिवासी असून एक मजला व्यापारी कारणांसाठी आहे. इमारतीमध्ये कापडांचे गोदाम आहे. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. सध्या संपूर्ण परिसरात धूर पसरला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा घटनेचे फोटो...