आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Balasaheb Thackeray's Doodle On Google, Shiv Sena Demand

‘गुगल डुडल’वर हवी बाळासाहेब ठाकरेंची छबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ८९ व्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी रोजी गुगल डुडलवर बाळासाहेबांचे छायाचित्र दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी मागणी करणारे पत्र गुगल इंडियाला पाठवण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. तसेच बाळासाहेबांच्या जीवनावर "संभवामि युगे युगे' हा माहितीपट तयार करण्यात आला असून शुक्रवारी उद्धव ठाकरे त्याचे प्रकाशन करणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे हे देश आणि जगभरातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे गुगलने त्यांना डुडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहावी, असा आमचा प्रयत्न आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अरुण जेटली यांनाही यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेला बाळासाहेबांच्या जीवनावरील ‘बाळकडू’ चित्रपट २३ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्याचप्रमाणे गिरगाव येथील शिवसैनिक दशरथ थारळी यांनी एक तासाचा 'संभवामि युगे युगे' हा माहितीपट तयार केला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांचे निवेदक आहे. या माहितीपटाच्या डीव्हीडीची किंमत १०० रुपये ठेवण्यात आली आहे.