मुंबई - इमेल व एसएमएसच्या माध्यमातून नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले.
न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली.
नाशिक येथील नामदेव व-हाडे यांनी २९ लाखांची फसवणूक झाल्यानंतर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २०१० मध्ये व-हाडे यांना एका बहुराष्ट्रीय कंपनीकडून पाच लाख डॉलर जिंकल्याचा एसएमएस आला. त्यानंतर व-हाडे यांनी बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी
आपले राहते घर विकून तब्बल २९ लाख रुपये संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीकडे भरले. मात्र, व-हाडे यांना कोणतीही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून १५ जण अजूनही फरार आहेत.