आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी अाणखी सुसह्य करा; व्यापाऱ्यांची मागणी; ग्राहकी वाढण्याची अपेक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नाेटाबंदी अाणि  जीएसटी  अंमलबजावणीचा  फटका बसल्याने यंदाच्या वर्षात व्यापारावर परिणाम झाला. ग्राहकांची मागणी कमी झाल्यामुळे व्यवसाय अाटला.  वस्तू अाणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर व्यापारी वर्गात अद्यापही संभ्रमाचे वातावरण अाहे. लक्ष्मीपूजनापासून सुरू हाेत असलेल्या नव्या व्यापारी वर्षात वस्तू अाणि सेवा करातील संभ्रम दूर व्हावा अाणि कर प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा अाहे.  

जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या तिमाहीत या कराचे सुलभीकरण झाल्याचे अपेक्षित प्रतिबिंब फारसे उमटले  नाही. ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्याने व्यापारी वर्गाला फायदा झाला नाही. सुसूत्रीकरणासाठी पेट्रोल-डिझेलसह सर्वच वस्तू  जीएसटीच्या कर कक्षेत आणाव्यात  अाणि पुन्हा एकदा जीएसटी परिषदेने नेहमीच्या वापराच्या वस्तूंच्या करनिश्चितीबाबत फेरआढावा घ्यावा, अशी मागणी विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांकडून करण्यात येत अाहे.   

नाेटाबंदी अाणि जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागले. जीएसटीची अंमलबजावणी झाली असली तरी त्यात अाणखी सुलभीकरण अाणण्याची गरज असून करप्रणालीमध्येदेखील नियमितता अाणण्याची गरज असल्याचे मत नवी मुंबई मर्चंट चेंबर असोसिएशन अाणि महाराष्ट्र काॅन्फेडरेशन अाॅफ अाॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी व्यक्त केले. चेंबर अाॅफ महाराष्ट्रीयन इंडस्ट्रियल  ट्रेडचे अध्यक्ष माेहन गुरनानी म्हणाले की, ‘बाजारात स्थिरता अाणण्यासाठी हा संभ्रम दूर केल्यास लहान व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल.  नवीन  व्यापार वर्षात जीएसटी अाणखी सुसह्य हाेऊन व्यापाराला चालना मिळेल.’  
मागील वर्षात व्यवसायात अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर अाता हळूहळू बाजारात सुधारणा होईल अाणि पुढच्या बारा महिन्यांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून त्याचा अार्थिक विकास वाढीला फायदा हाेऊ शकेल, असे क्लाेदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मेहता यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत अाणा  
जीएसटीमुळे वस्तूंचे दर कमी राहतील असे सांगण्यात अाले हाेते. कमाल १८ टक्के जीएसटी असावा अशी व्यापारी वर्गाची मागणी हाेती. परंतु सरकारने काही वस्तूंवर २८ टक्के कर अाकारल्यामुळे वस्तू स्वस्त हाेण्याएेवजी महाग हाेऊन त्याची झळ सामान्य ग्राहकांना बसली. ग्राहकांची खरेदी घटल्याने व्यवसायावर परिणाम झाला. मुख्य म्हणजे पेट्रोल अाणि डिझेलदेखील जीएसटीच्या कक्षेत अाणले तर जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी हाेतील तसेच वाहतूक खर्च कमी होईल. ग्राहकांसाठी वस्तू स्वस्त झाल्या  तर ते खरेदीला उद्युक्त हाेतील, अशी अपेक्षा फेडरेशन अाॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...