आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन इंडिया सप्ताह’चा पहिला मान महाराष्ट्राला; पंतप्रधानांच्या हस्ते उद‌्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारताची औद्योगिक शक्ती जगाला दाखविण्यासाठी ‘मेक इन इंडिया सप्ताह’ आयोजित करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. या सप्ताहाचे उद् घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीस होणार असून १८ फेब्रुवारीपर्यंत हा सप्ताह चालेल. अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्रप्रमुखांसह १० हजारांवर अधिक औद्योगिक शिष्टमंडळे या कार्यक्रमात सहभागी हाेणार अाहेत.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘लामण दिवा’ हा उद्योग चक्रांचा वापर करून बनविण्यात आला असून संस्कृती आणि औद्योगिकशक्ती याचा मिलाफ करून या सप्ताहाचे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते शुक्रवारी झाले. गुंतवणूकवृद्धीसाठी, नव्या संकल्पनांना वाव देण्यासाठी, कौशल्य विकास वृद्धिसाठी बौद्धिक संपदेचे रक्षण करण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्रात सर्वोत्तम पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा सप्ताह अायाेजित केला अाहे.

पहिल्या दिवशी सूक्ष्म आणि मध्यम उद्योग, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगत तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा सांगण्यासाठी १४ तारखेला ‘महाराष्ट्र नाइट’चे आयोजन करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘मेक इन मुंबई’ सेमिनार हाेतील. जागतिक स्तरावरील कंपन्यांचे सीईओ आणि विविध क्षेत्रातील उद्योजक ‘गुंतवणूक संधी’ या विषयावर चर्चा करतील.

बीकेसीत भव्य सेंटर
उद्योगक्षेत्रातीलयशकथा आणि भारतीय उत्पादन क्षेत्रातील बदलते प्रवाह अधोरेखित करण्यासाठी एमएमआरडीए ग्राउंड्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ‘मेक इन इंडिया सेंटर’उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी मेक इन इंडिया सेंटरमध्ये खास पॅव्हेलियन असेल.

मुख्यमंत्र्यांचा संकल्प
जागतिकस्तरावर डावोस, व्हॅनोवर यांनी इकॉनॉमिक फोरम म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्याच धर्तीची जागतिक औद्योगिक परिषद मुंबई येथे आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.