आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलितांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद करा : आठवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दलितांवर होणा-या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सरकारने हे अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच या अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी केली.

गृहमंत्री आर.आर.पाटील यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर ते पत्रकार परिषेदत बोलत होते. आठवले म्हणाले की, भंडारा जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुलींचे हत्याकांड, पुणे जिल्ह्यातील दलित कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांची हत्या तसेच नगर जिल्ह्यातील दलित महिलेवर अत्याचार करणा-यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही पाटील यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून त्यांनी आपले माजी खासदार आणि आमदार म्हणून मिळणारे 52 हजार 585 रुपयांचे निवृत्तिवेतनही मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द केले.