आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysian Airline News In Marathi, Malayasia Tourism Department

मलेशियन विमान सुखरूप, लवकरच छडा लागेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दहा दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या एमएच-370 या मलेशियन विमानाचा मागमूस काढण्यासाठी दहा-बारा देशांनी 77 लाखांपेक्षा जास्त किमींच्या परिघात आपल्या यंत्रणा जुंपल्या आहेत. ते गायब होण्यामागे दररोज नवनवे कयास वर्तवले जात असतानाच मलेशियाच्या पर्यटन विभागाचे संचालक मिर्झा मोहंमद तय्यब यांनी सर्व शक्यता धुडकावून लावल्या आहेत. एमएच-370 दुर्घटनाग्रस्त झाले नसल्याचा दावा तय्यब यांनी केला आहे. ‘दिव्य मराठी’ त्यांनी याबाबत माहिती देत विमानातील प्रवासी सुखरूप असल्याची आशाही व्यक्त केली आहे.


मलेशियाच्या पर्यटन योजनेची माहिती देण्यासाठी मिर्झा मोहंमद मुंबईत आले होते. ‘दिव्य मराठी’कडे ते म्हणाले, भारतातील टूर ऑपरेटर्समध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आम्ही माहितीचा कार्यक्रम रद्द केला नाही. मलेशियन सरकार व 10 ते 12 देश बेपत्ता विमान शोधण्याचा कसून प्रयत्न करत आहे. भारतीय नौदलानेही मोठे प्रयत्न केले, मात्र आता शोध थांबवला आहे.


या देशांचे आम्ही खूप आभारी आहोत. विमानातील भारतीय पर्यटकांच्या कुटुंबांशी संपर्क साधण्याचे काम एअरलाइन्सने केलेले आहे. त्यांना सर्व ती मदत दिली जात आहे. त्याबाबत सविस्तर माहिती एअरलाइन्सच देऊ शकते, असे मिर्झा मोहंमद यांनी स्पष्ट केले.


विमानाचा अपघात नाहीच
विमानाचे नक्की काय झाले? या प्रश्नावर मोहंमद उत्तरले की, ते दुर्घटनाग्रस्त झाले नसल्याचे आम्हाला वाटते. विमान दुर्घटनाग्रस्त झाले असते तर त्याचे अवशेष आतापर्यंत सापडले असते. त्यामुळे विमान सुखरूप असावे, त्याचा ठावठिकाणा व यामागे कोण असावे, याचाही शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.