आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Male Candidate Select On Women Reserved Seat mpsc\'s Mahapuran

महिलांच्या आरक्षित जागांवर पुरुष उमेदवारांची निवड - ‘एमपीएससी’चे महापुराण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नगर नियोजक पदासाठीचे आरक्षण महिलांसाठी राखीव असतानादेखील त्या जागांवर पुरुष उमेदवारांची निवड करून राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

नगर नियोजक पदाच्या 20 रिक्त जागांपैकी 10 जागा महिला व इतर वर्गांसाठी आरक्षित होत्या. या पदांसाठी 68 महिलांचे अर्ज येऊनही त्यापैकी एकीचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, असा आक्षेप सुनील काटे यांनी याचिकेत घेतला आहे. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती, परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे राज्य माहिती आयोगाकडे अपील केले आहे. दरम्यान, एमपीएससीने नियुक्तीपत्र दिलेल्या उमेदवारांनाही प्रतिवादी करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

काय आहे प्रकरण?
नगर नियोजक पदाच्या 20 जागा भरण्यासाठी 2008 मध्ये अर्ज मागवले होते. त्यापैकी 3 जागा महिलांसाठी राखीव होत्या, पण एमपीएससीने या जागांवर दुस-या च उमेदवारांची भरती केली. तसेच, लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारेच जागा भरल्याचा काटे यांचा आरोप आहे. याप्रकरणी नगरविकास विभाग, पोलिस महासंचालक व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली नव्हती.