आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालेगाव स्फोटामधील आरोपी दोषमुक्त कसे? एनआयला हायकोर्टाचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आठ आरोपींची निर्दाेष मुक्तता केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.

निर्दोष मुक्त करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आव्हान दिले होते. या वर्षी एप्रिलमध्ये एनआयएच्या अहवालावर सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दाेष सुटका केली होती. अहवालात म्हटले होते की, स्फोटात कुण्या हिंदू कट्टरपंथी गटाचा हात आहे. प्रकरणात सात हिंदू आरोपींनीही उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

न्या. आर.व्ही. मोरे व शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या पीठाने एनआयएला जामीन याचिकांबाबतही दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. ८ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या हमिदिया मशिदीनजीकच्या स्फोटात ३७ जण ठार तर १०० जखमी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...