आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव बॉम्बस्फोटाची कागदपत्रे कोर्टातून गहाळ, जयंत पाटलांची चौकशीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोटांची कागदपत्रे कशी गहाळ झाली? यात संशयाला जागा असून यामागे कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याची कागदपत्रे कोर्टातून गायब होण्याच्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, ‘मालेगाव बॉम्बस्फोटाची कागदपत्रे ही न्यायालयाच्या अधीन आहेत. त्याचा राज्य सरकारशी संबंध नाही. न्यायालयाकडून माहिती मिळाल्यास सभागृहात माहिती सादर करू. परंतु या उत्तराने आमचे समाधान झालेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
2008 आणि 2009 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील कागदपत्रे कोर्टातून गहाळ झाली आहेत. ही कागदपत्रे गहाळ करण्यामागे कोणाचा हात आहे?’ असा सवाल करून कोर्टातून कागदपत्रे गहाळ करण्यामागे षड्यंत्र आहे, असा आरोपही त्यांनी पत्रकारांशी केला. कागदपत्रे अशी गहाळ होण्याच्या प्रकरणाविषयी सरकारने निवेदन दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.