आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका 'पँथर'मधून बाहेर; रामटेके यांच्याकडे धुरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र संग्रहित)
मुंबई- दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ कवयित्री मल्लिका अमरशेख-ढसाळ यांनी संघटनेतील सर्व पदांचा त्याग केला असून सर्व सूत्रे नागपूरच्या प्रकाश रामटेके या जुन्या कार्यकर्त्याच्या हाती सुपूर्दकेल्याची माहिती शुक्रवारी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.
पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ स्थापनेपासून संघटनेचे अध्यक्ष होते. १५ जानेवारी २०१४ रोजी ढसाळ यांचे निधन झाले. त्यानंतर संघटनेची सूत्रे त्यांच्या पत्नी मल्लिका यांनी हाती घेतली; परंतु त्यांना बाजूला ठेवून इतरच निर्णय घेऊ लागले. त्यामुळे मल्लिका यांनी काम करण्याचे थांबवले होते.
माझा पिंड राजकीय कार्यकर्त्याचा नाही. त्यामुळे मी यापुढे संघटनेत कार्यरत न राहण्याचे ठरवले आहे. पँथरमध्ये यापुढे माझी काहीएक भूिमका नसेल, असे मल्लिका ढसाळ यांनी या वेळी सांगितले.
याचवेळी मल्लिका यांनी प्रकाश रामटेके यापुढे पँथरचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील असे जाहीर केले. रामटेके यांनी पँथरच्या स्थापनेपासून संघटनेते काम केले आहे. नामदेव ढसाळ यांच्या ते अत्यंत विश्वासू मानले जात होते. विदर्भात पँथरच्या वाढीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे रामटेके यांच्या हाती संघटनेची धुरा दिल्याचे मल्लिका यांनी सांगितले.
नाते संपले
पँथरची स्थापना १९७१ ची आणि फाटाफूट १९७५ मधली. नामदेवच्या मृत्युपर्यंत पँथरचे अस्तीत्व नावालाच होते. ढसाळांच्या मृत्युनंतर मल्लिका अध्यक्ष झाल्या. त्यांनी लागलीच शिवसेनेबरोबर काडीमोड घेतला. सीएसटीला चारदोन वेळा निदर्शनेही केली. आणि आज संघटनेतून निवृत झाल्या. अशा प्रकारे दलित पँथर आणि ढसाळ हे नाते कायमचे संपुष्टात आले.
स्वतंत्र वसाहती करा
राज्यात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे दलितांसाठी यापुढे स्वतंत्र वसाहती निर्माण करण्यात यावेत अशी मागणी पँथरच्यावतीने मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांना करण्यात येणार असल्याचे पँथरचे नवे अध्यक्ष प्रकाश रामटेके यांनी"दिव्य मराठी'ला सांगितले.