आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंगफिशरप्रमाणे मल्ल्याही उडून गेले, याचिका सुनावणीवेळी हायकाेर्टाची टिप्पणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बँकांचे नऊ हजार कोटी घेऊन पळ काढलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या हा त्याच्या कंपनीचे नाव असलेल्या किंगफिशर पक्ष्याप्रमाणे उडून गेल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी केली. न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या पीठासमोर सेवा कर विभागाने दाखल केलेले अपील आणि एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान कडक शब्दांत मल्ल्यावर ताशेरे ओढण्यात आले. मल्ल्याने त्याच्या कंपनीचे नाव किंगफिशर का ठेवले हे कोणाला माहिती आहे का, असा प्रश्न विचारत न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी त्याच्यावर टिप्पणी केली. किंगफिशर ज्याप्रमाणे सीमांचे बंधन न पाळता कितीही दूर उडून जाऊ शकतो त्याप्रमाणे मल्ल्यालाही कोणी थांबवू शकले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने सेवा कर विभागाच्या अपिलाला स्वीकारले आहे. याचिकेत विभागाने कर्ज पुनर्प्राप्ती न्यायाधिकरणाद्वारे २०१४ मध्ये दिलेल्या एका आदेशाला आव्हान दिले आहे. पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला आहे.
बातम्या आणखी आहेत...