आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळशेज घाट दोन दिवस बंद; पर्याय मार्ग वापरण्याचे आवाहन, 100 किमीचा फेरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळशेज घाट दरडी कोसळण्याची भीती असल्याने बंद करण्यात आला आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
माळशेज घाट दरडी कोसळण्याची भीती असल्याने बंद करण्यात आला आहे. (संग्रहित फोटो)
मुंबई/नाशिक- मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे दरड कोसळण्याची भीती असल्याचा तांत्रिक अहवाल आल्यानंतर ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाट वाहतुकीबरोबर पर्यटनासाठीही बंद करण्यात आला आहे. 

घाटातील वाहतूक बंद असल्याने पुण्यावरून येणारी वाहने चाकण मार्गे तर कल्याण, मुंबई, नवी मुंबईतून येणारी वाहने सरळगाव, शहापूर फाटा मार्गे वळवण्यात आली आहेत. शनिवार-रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी माळशेज घाटात पर्यटनाला जाण्याचे नियोजन केले आहे. त्यांनाही याचा फटका बसणार आहे. 
 
मुंबईहून निघणाऱ्या प्रवाशांनी कल्याण-बदलापूर-कर्जत-चौक फाटा-खोपोली हायवे आणि कल्याण, नेवाळी, तळोजा बायपास-पुणे लिंक रोड या मार्गाचा वापर करावा. कल्याण-मुरबाड-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचा भाग असल्याने माळशेज घाट बंद असल्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गाने 100 ते 150 किलोमीटर फेरा मारावा लागत आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...