आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamata Kulkarni Indulged In Drugs Smuggling With Her Husband

2200 कोटींच्या सोलापूर एफेड्रिन ड्रग्ज तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीचे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2200 कोटींच्या एफेड्रिन ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणात एकेकाळची बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचा सहभाग असल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे. - Divya Marathi
2200 कोटींच्या एफेड्रिन ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणात एकेकाळची बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचा सहभाग असल्याचे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबई- या महिन्यात ठाण्यात पकडलेल्या 2200 कोटींच्या एफेड्रिन ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणात एकेकाळची बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या सहभागाची चौकशी केली जात आहे. ठाणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानंतर त्यांच्या लक्षात आले आहे की, सोलापूर एफेड्रिन प्रकरणात ममता कुलकर्णीचा सहभाग असावा. या ड्रग्ज प्रकरणात ममताचा पती विकी गोस्मावी हा प्रमुख चेहरा असल्याचे मानले जात आहे. विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी सध्या केनियात राहत आहेत.
2200 कोटींचे ड्रग्ज केलेय जप्त-
गुजरात एटीएसने 15 एप्रिल रोजी अहमदाबादच्या रिया इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून 270 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.
- त्यानंतर ठाणे व सोलापूरची लिंक मिळाली.
- ठाण्यात टाकलेल्या धाडीत 2000 कोटींचे एफेड्रिन ड्रग्ज जप्त करण्यात आले.
- त्यानंतर सोलापूरातून 200 कोटींचे एफेड्रिन ड्रग्ज जप्त करण्यात आले.
- अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातील मास्टरमाईंड पुनीत श्रींगी याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
- पुनीतने सांगितले की, एव्हॉन ऑरगॅनिक्स कंपनीचा एक संचालक मनिष जैन हा केनियात विकी गोस्वामीला अनेक वेळा भेटला आहे.
- पडकलेले 20 टन ड्रग्ज भारत, पोलंड आणि युरोपियन देशात पाठवले जाणार होते.
- हे ड्रग्ज मुंबईतून गुजरातमार्गे ईस्टर्न युरोपमध्ये पाठवले जाणार होते.
ममताच्या सहभागाचा पोलिसांना संशय का?
- ठाणे पोलिसांचे आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले की, हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असून या रॅकेटचा मुख्य सुत्रधार विकी गोस्वामी आहे.
- याच कारणामुळे ठाणे पोलिस ममता कुलकर्णीच्या सहभागाविषयी चौकशी करीत आहे.
- पोलिसांनी सांगितले की, अमेरिकन ड्रग्ज इन्फोर्समेंट एजेन्सी (डीईए)ने विकीच्या ऑपरेशनची माहिती दिली ज्यात तो मुख्य संशयित आहे.
- ठाणे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे की, या रॅकेटचा चेहरा म्हणून विकी गोस्वामी ममताचा वापर करीत आहे.
- इंटरपोलच्या अलर्टमुळे विकी केनियाच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे तो ममताला दुबई, सिंगापूर, दक्षिण अफ्रिका आणि अमेरिकेतील ग्राहकांना भेटविण्यासाठी पाठवतो व व्यवहार चालवतो.
- ममता महाराष्ट्रातील ड्रग्ज नेटवर्कसोबतही बिझनेस डील करते. याशिवाय विकी पैशांची देवान-घेवाण करण्यासाठी ममताच्या बॅंक खात्याचा वापर करतो.
- हे जोडपं केनियात बसून हवालाच्या मार्फत ड्रग्जचे पैसे दुस-या देशात पाठवते.
कोण आहे विकी गोस्वामी
- विकी गोस्वामीचा ड्रग्ज क्राईममध्ये लांबचा व मोठा इतिहास आहे.
- विकीला 1997 मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक झाली होती. तेथे त्याला 15 वर्षाची शिक्षा झाली होती.
- ही शिक्षा उपभोगल्यानंतर विकीने ममता कुलकर्णीसोबत लग्न केले व तिला घेऊन केनियाची राजधानी नैरोबीत गेला आहे.
- तेथेही तो ड्रग्जच्या तस्करीत अडकला आहे. केनियातही त्याच्यावर अनेक केस सुरु आहेत.
- यूएस आणि ठाणे पोलिसांना या ड्रग्ज प्रकरणी विकी हवा आहे.
का आहे एफेड्रिनला जास्त मागणी
- एफेड्रिन ड्रग्जला भारतात बंदी आहे. मात्र इतर देशात अस्थमा आणि ब्रॅनकायटिसच्या आजारासाठी ते वापरले जाते.
- मागणी जास्त असल्यामुळे या ड्रग्जच्या व्यवसायात जास्त नफा आहे.
पुढे वाचा, नायजेरियन स्मगलरकडून मिळाली लिंक...