आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमली पदार्थ तस्करीतील आरोपी ममता कुलकर्णी दुबईला पसार, महाराष्ट्रात आहे वॉन्टेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिच्या पतीला केनियात फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली. - Divya Marathi
तिच्या पतीला केनियात फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली.
मुंबई - बॉलिवुड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता दुबईला पसार झाली आहे. ममतासह 14 जणांवर अमली पदार्थ तस्करीचे आरोप आहेत. 1997 मध्ये विकी गोस्वामीला तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 11.5 किलो मॅन्ड्रेक्स ड्रग्स जप्त करण्यात आले होते. विकी गोस्वामी हा ममता कुकर्णीचा पती आहे. 2003 मध्ये त्याची सुटका झाल्यानंतर दोघेही नैरोबीला स्थायिक झाले. आता मात्र, ममता चक्क दुबईला पळाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
 
महाराष्ट्रात आहे वॉन्टेड
- विकी गोस्वामी आणि माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी या दोघांना ठाणे पोलिसांनी 2000 कोटींच्या अमली पदार्थ तस्करी आणि पुरवठा प्रकरणी यापूर्वीच वॉन्टेड घोषित केले आहे.
- अमली पदार्थ तस्करी विरोधी कायदा अंतर्गत दोघांनाही कुख्यात अमली पदार्थ तस्कर संबोधण्यात आले आहे. तसेच कोर्टाने त्यांच्या संपत्तीला टाच आणण्याचे आदेश दिले आहेत. 
- 1997 मध्ये विकी गोस्वामीला अटक करण्यात आली. मात्र, 2003 मध्ये जामीनावर सुटल्यानंतर तो ममतासह केनियात पसार झाला. 
- केनियात स्थायिक झालेले या आरोपी दांपत्याने स्थानिक आणि पाकिस्तानी तस्करांसह अनेक आंतरराष्ट्रीय तस्करांशी डीलिंग केल्या आहेत. त्यांना फेब्रुवारीमध्ये अटक सुद्धा करण्यात आली होती. 
- त्यावेळी ममता कुलकर्णी सुद्धा केनियातच होती. मात्र, तिला पोलिस अटक करू शकले नव्हते. आता मात्र, ती दुबईला पळाल्याचे समोर आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...