आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅसेंजर एअर होस्टेसला म्हणाला- चलो ना यार सेल्फी लेते है, मुंबईला उतरताच झाली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुजरातच्या एका व्यक्तीला एअर होस्टेससोबत सेल्फी घेण्याच्या आरोपात सोमवारी अटक करण्यात आली. मोह बराच महागात पडला आहे. 29 वर्षांच्या मोहम्मद अबू बकरवर फ्लाइटमधील टॉयलेटमध्ये स्मोकिंग करण्याचाही आरोप आहे.

काय आहे प्रकरण
- ही घटना सोमवारी जेट एअरवेजच्या दमन-मुबंई फ्लाइटमध्ये घडली.
- एअरक्राफ्ट मुंबई छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरल्यानंतर एअर होस्टेसने मोहम्मद अबू बकरविरोधात तक्रार दिली.
- तक्रारीत म्हटले आहे, की दमन येथून फ्लाइटने टेकऑफ केल्यापासून आरोपी एअर होस्टेससोबत गैरवर्तन करत होता.
- एअर होस्टेसने म्हटले, 'मी फ्लाइटमध्ये सर्व्ह करत होते तेव्हा आरोपीने माझा हात पकडला आणि - चलो ना यार एक सेल्फी लेते है, अस म्हणू लागला. मी विरोध केल्यानंतरही संपूर्ण प्रवासादरम्यान तो त्रास देत होता.'

पूर्ण प्रवासात मागे-मागे फिरत होता
- एअर होस्टेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे, की फ्लाइटमध्ये आरोपी माझ्या मागे-मागे फिरत होता. संपूर्ण प्रवासात त्याचे सीट रिकामे होते. त्याने हद्द ओलांडली होती. माझ्या खांद्यावर हात ठेवून त्याने बळजबरीने सेल्फी घेतली.
- एअर होस्टेसच्या तक्रारीनुसार, आरोपीच्या वर्तनाने घाबरलेली एअर होस्टेस जेव्हा ओरडली तेव्हा चार क्रू मेंबर धावत आले. त्यांना पाहून आरोपी टॉयलेटमध्ये जाऊन बसला. तिथे त्याने स्मोकिंग करण्यास सुरुवात केली.
- तक्रारीत म्हटले आहे, की कॅबिन क्रू मेंबर्सनी त्याला स्मोकिंग न करण्याची वांरवार सुचना केली. सिगारेटचे पाकिट मागितले. मात्र त्याने काहीही ऐकले नाही.

पुढील स्लाईडवर वाचा... स्मोकिंग करुन अनेक प्रवाशांचा जीव संकटात टाकला.... वाचा सोशल मीडियावर आलेल्या तिखट रिअॅक्शन्स....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...