आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिराला नाही आली गर्भवती वहिणीवर दया, पळत केले 16 वेळा चाकूने वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निखत शेख या महिलेवर तिच्या दिराने हल्ला केला. - Divya Marathi
निखत शेख या महिलेवर तिच्या दिराने हल्ला केला.
मुंबई- नालासोपाऱ्यात सोमवारी एका महिलेवर तिच्या दिराने चाकूने 16 वेळा वार करत तिचा खून केला. यावेळी या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या मैत्रिणीचे बोटही या घटनेत कापले गेले. या घटनेनंतर आरोपी सलमान फरार झाला आहे.
 
असा केला खून
- उपविभागीय अधिकारी दत्ता टोटेवडे यांनी सांगितले की, टाकी पाडा भागातील नसीमा अपार्टमेंटमध्ये राहणारी निखत शेख (वय 24) यांच्यावर त्यांचा दीर सलमान हबीबउल्ला शेखने चाकूने हल्ला केला.
- निखत ही आपल्या पतीसमोर राहत होता. त्यांचे पती मुंबईत ओलाची कॅब चालवतात. त्या दुपारी 12 वाजता आपल्या घरात मैत्रिण नुरी परवीन (वय 22) हिच्यासोबत गप्पा मारत होत्या. त्याचवेळी त्याच्या घराजवळच राहणारा त्यांचा दीर सलमान तिथे आला आणि त्याने चाकूने वार केले. त्याने निखतवर एकापाठोपाठ तिच्यावर 16 वार केले.
 
निखतच्या भावाचा आरोप
- निखतचा भाऊ मोहसिनने याबाबत तिच्या सासरच्यावर आरोप केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार निखतच्या पतीचे बाहेर कुणाशीतरी प्रेमप्रकरण सुरु होते.
- त्याने सांगितले की ते तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्यादही दिली होती.
- त्याने कट रचुन निखतचा खून करण्यात आल्याचा आरोप लावला आहे.
 
आरोपी अजुनही आहे फरार
- नुरी परवीन या निखतच्या मैत्रिणीचे बोट घटनेत तुटले आहे. निखत स्वत:ला वाचविण्यासाठी घराबाहेर पळाली पण आरोपीने तिचा पाठलाग करत खून केला.
- खून केल्यावर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी निखतचा मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.      
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...