आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांबाबत चुकीची माहिती पोस्ट करणा-या तरूणाला पोलिसांकडून अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय वाटेवार याने दोन वर्षापूर्वीचा हाच फोटो पोस्ट केला होता. - Divya Marathi
अजय वाटेवार याने दोन वर्षापूर्वीचा हाच फोटो पोस्ट केला होता.
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना फोटो टि्वटरवर पोस्ट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी अजय हाटेवार नावाच्या तरूणाला अटक केली आहे. मुंबईतील ओशीवारा पोलिसांनी अजय हाटेवार याला ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांबाबत खोटी माहिती पसरवून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची बदमानी केल्याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते संजय पांडे यांनी पोलिसांत केली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ओशिवारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हाटेवार नावाच्या तरूणाने 2 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचा कुटुंबासोबतचा दोन-तीन वर्षांपूर्वीचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. ज्यामध्ये मुख्यमंत्री आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा दिसत आहेत. अजय हाटेवार याने 2 जुलै रोजी टि्वटवर एक फोटो पोस्ट करीत मुख्यमंत्री अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करत असल्याचे व देखो, अच्छे दिन आ गए अशी खिल्ली उडविली होती. मात्र, अजय वाटेवार यांनी टि्वटवर पोस्ट केलेला फोटो दोन -तीन वर्षापूर्वीचा तो ही गोव्यातील असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गोव्यातील बोटिंगवरचा फोटो झपाट्याने व्हायरल होत होता. त्याबाबत कोणतेही शहानिशा करता लोक त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देत होते. त्यामुळे फडणवीस यांची बदनामी होत होती. अखेर पांडे यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबईतील ओशिवारा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांबाबत चुकीची माहिती पसरविल्याच्या आरोपावरून अजय वाटेवार याला अटक केली आहे. अजय वाटेवार याला ताब्यात घेऊन अटक केल्याप्रकरणी सोशल मिडियातून नाराजी व्यक्त होत आहे. केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार लोकांची तोंडे बंद करीत आहे असा आरोप काही नेटिझन्सनी केला आहे.
पुढे पाहा, काय काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत सोशल मिडियात...
बातम्या आणखी आहेत...