आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Cannot Take Away Child From Divorced Wife: Court

विभक्त पत्नीपासून पतीला मुलाचा ताबा घेता येणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर केवळ कायदेशीर पालकत्वाच्या आधारावर पती तिच्याकडील मुलाचा ताबा मिळवू शकत नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. वडिलांच्या गैरहजेरीत आईकडे मुलाचे तेवढेच पालकत्व येते, असा निर्वाळा न्या. रोशन दळवी यांनी दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशाशिवाय कायदेशीर पालकाने मुलाबाबतच्या निर्णयात ढवळाढवळ करू नये, असेही बजावत कोर्टाने ललितकुमार यादव यांना आपला अल्पवयीन मुलगा देवर्षीला आईकडे सोपवण्यास सांगितले. ललितकुमारने आदेशाचे पालन न केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. मुलाच्या प्रगतीचा दस्तऐवज न्यायालयात सीलबंद ठेवण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे. मुलाचा ताबा आईकडे देण्याच्या पुणे न्यायालयाच्या निकालास यादवने आव्हान दिले होते.

पतीपासून विभक्त झाल्यानंतर ललितची पत्नी आई-वडिलांसोबत वडगाव मावळमध्ये राहत आहे. मुलगा सहा वर्षांचा असताना वडिलांनी 2012 मध्ये त्याचा ताबा मिळवला होता. याप्रकरणी महिलेने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी आईकडे मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. मात्र पुण्याच्या सत्र न्यायालयाने आईच्या बाजूने निकाल दिला होता.यादवने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.