आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केस कापले, न्यूड करुन दिले सिगारेटने चटके; या महिलेसोबत घडायचे असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपीने कापलेले महिलेचे केस. - Divya Marathi
आरोपीने कापलेले महिलेचे केस.

मुंबई- भिंवडी एक व्यक्ती आपल्या पत्नीला अश्लील चित्रफिती दाखवत तिच्यासोबत तशा पध्दतीचे चाळे करण्याचा प्रयत्न करायचा. पत्नीने त्याला नकार दिल्यावर तो तिला सिगारेटने चटके द्यायचा आणि रात्रभर हात-पाय बांधून तिला जागे राहण्यास भाग पाडायचा. त्याच्या या छळाला कंटाळून अखेर तिने एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आणि भिवंडी पोलिसांकडे तक्रार दिली. आता या नराधमाला गजाआड करण्यात आले आहे. 

 

 

महिलेने लावले अनेक गंभीर आरोप

 


- भिवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर भागात राहणाऱ्या 20 वर्षीय मुमताजचे (नाव बदललेले आहे) लग्न कल्याण येथील रोहिदासवाड्यात राहणाऱ्या मुख्तारसोबत दीड वर्षांपुर्वी झाले.
- आरोपी मुख्तारला पॉर्न चित्रपट पाहण्याची आवड आहे. तो आपल्या पत्नीला जबरदस्तीने अश्लील चित्रपट दाखवायचा. त्यानंतर तो तिच्यासोबत आपत्तीजनक गोष्टी करायचा.
- मुमताजने याला विरोध केल्यास तो तिचे हात-पाय बांधुन तिला सिगारेटने चटके द्यायचा. तिला नग्न करुन तिला बेल्टने मारायचा. तिला रात्रभर जागे राहायला लावायचा आणि जेवणही देत नव्हता. 

- त्याने मुमताजचे केस सुध्दा कापले. त्याच्या त्रासाला वैतागुन मुमताजने जीव देण्याचा प्रयत्न केला होता.

- आरोपी मुख्तारने मुमताजला जीवे मारण्याची धमकी दिली. तिचा फोटो व्हॉट्स अपवरुन त्यांना पाठवून आपले म्हणणे न ऐकल्यास मुमताजचे कापलेले मुंडके पाठविण्याची धमकी दिली. 

 

 

एनजीओच्या मदतीने करण्यात आली अटक
- त्यानंतर मुमताजची ओळख स्वाती कांबळे नावाच्या एक महिलेशी झाली. ही महिला एका एनजीओचे काम करते.
- मुमताजने आपले दु:ख स्वाती यांना सांगितल्यावर त्यांनी भिवंडी पोलिसांकडे फिर्याद दिली.
- त्यानंतर मुख्तारविरोधात आयपीसी कलम 377, 498 A, 324, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...