आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूटी चालवणाऱ्याने तोडला सिग्नल, कॉन्स्टेबलने रोखल्यावर त्याने केले त्याच्यासोबत असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुचाकी रोखण्यावरुन हा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. - Divya Marathi
दुचाकी रोखण्यावरुन हा वाद सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई- वसईत सिग्नल तोडणाऱ्या एका स्कूटी चालवणाऱ्या वाहनचालकाला पोलिस शिपायाने रोखले. पोलिसने रोखल्यावर चिडलेल्या वाहनचालकाने थेट त्याच्या थेट कानशिलाखाली लगावल्याची घटना घडली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
असा सुरु झाला वाद
वसई येथील पार्वती थिएटरजवळ ही घटना घडली. या ठिकाणी एक पोलीस शिपाई आपले कर्तव्य बजावत होता.
- त्याचवेळी तेथून जाणाऱ्या सोहेल मेनन याने सिग्नल तोडला. त्यावेळी तेथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचारी मुंडेंनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
- पोलिसाने रोखल्याने चिडलेल्या सोहेल मेननने मुंडेंना मारहाण करण्यास सुरुवात केली.
- त्याने अनेक वेळा मुंडेंच्या कानशिलाखालीही लगावल्या. तेथे उपस्थित असणाऱ्यांनी हे सर्व मोबाईलमध्ये शुट केले. त्यानंतर नागरिकांनीच ही बाब पोलिसांना कळवली.
- सोहेलने हल्ला केला त्यावेळी त्याची पत्नी आणि मुलेही त्याच्यासोबत होती.
- पोलिसांनी याप्रकरणी सोहेलवर गु्न्हा दाखल केला आहे. नेमक्या कोणत्या कारणाने त्याच्यात हा प्रकार घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा नेमके काय घडले याचे फोटो
बातम्या आणखी आहेत...