आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नल तोडणार्‍या स्कूटी चालकास थांबवणे वाहतूक पोलिसाला पडले चांगलेच महागात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच प्रकारची एक घटना वसईत घडली आहे. सिग्नल तोडणार्‍या स्कूटी चालकाला थांबवणे एका वाहतूक पोलिसाला चांगलेच महागात पडले. संतापलेल्या स्कूटी चालकाने कान्स्टेबलच्या कानात लगावल्या. दरम्यान, याप्रकरणी आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण?
- मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना 7 ऑगस्टची आहे. वसई (पश्चिम) मधील पार्वती थिएटरसमोरील सिग्नलवर एक वाहतूक पोलिस कर्तव्य बजावत होता.
- तितक्यात सोहेल मेनन यांनी सिग्नल तोडला. त्यांच्यासोबत पत्नी होती.ऊ
- सिग्नलवर उभे असलेले कॉन्स्टेबल मुंडे यांनी मेनन यांना थांबवले. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
- वाद विकोपाला पोहोचला आणि सोहेल मेनन यांनी कॉन्स्टेबल मुंडे यांच्या कानात लगावल्या.  
- सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...