आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकीनाक्यात 3 मुलींना विष पाजून 40 वर्षीय पित्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मुंबईतल्या साकीनाका भागात एका पित्यानं त्याच्या तीन मुलींना ठार मारून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. साकीनाका परिसरातल्या मोहाली व्हिलेजमध्ये राहणाऱ्या मंगेश अनेराव या 40 वर्षीय पित्यानं मुलींना विष पाजलं. मालमत्तेच्या वादातून मंगेशनं हे टोकाचं पाऊल उचललं.
शनिवारी सकाळी सहा वाजता मंगेशनं त्याची बायको आणि मुलाला मिरा रोडला नातेवाईकांकडे पाठवलं. यानंतर त्यानं एक वर्षाच्या दोन जुळ्या मुली आणि 4 वर्षाच्या एका मुलीला विष पाजलं आणि स्वतःदेखील विष पिऊन आत्महत्या केली.
मंगशेकडे सध्या कोणतंही काम नव्हतं. त्याच्या राहत्या खोलीवरून सख्खा भावाबरोबर वाद सुरु होता. राहती खोली विकून दोघांनी दुसरी जागा घेण्यासाठी मंगशेचे वडिल आग्रह करत होते. मंगेश ऐकत नसल्यामुळे वडिलांनी कायदेशीर मार्ग अवलंबला. साकिनाका पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
बातम्या आणखी आहेत...