आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्‍यात गर्भवती पत्नी, तीनवर्षीय मुलासमोर एकाची पाच जणांकडून हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - गर्भवती पत्नी, तीनवर्षीय मुलासमोर एका व्यक्तीची पाच जणांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे गुरुवारी उघडकीस आली. सनी वाल्मीकी (२८) असे मृताचे नाव आहे. सनी पत्नी आणि तीनवर्षीय मुलासह उल्हासनगर येथे राहतो. काही दिवसांपूर्वी त्याचे आरोपींशी भांडण झाले होते.

७ जून रोजी पाचही आरोपी वाल्मीकीच्या घरी गेले. त्यानंतर आरोपींनी वाल्मीकीला चार महिन्यांची गर्भवती पत्नी आणि तीनवर्षीय मुलासमोर बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्नीने त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, सनीच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
 
बातम्या आणखी आहेत...