आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Kills Son In Thane For Not Attending School News In Marathi

वडिलांच्या मारहाणीत ठाण्यात मुलाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुलगा शाळेत जात नाही म्हणून वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू, तर नातवाचा देह पाहून आजीनेही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. अंबरनाथ येथील शिवाजीनगरमध्ये राहणारा अजीज खान शनिवारी रात्री कामावरून परत आला. तेव्हा चौथीत शिकणारा मुलगा साजिद शाळेत गेला नसल्याचे त्याला समजले. त्यामुळे रागाच्या भरात अजीजने साजिदला लाकडी पट्टीने मारण्यास सुरुवात केली. यात एक प्रहार वर्मी बसल्याने साजिदचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यासमोर नातवाने प्राण सोडल्याचा धक्का आजी सहन करू शकली नाही. त्यामुळे काही मिनिटांतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आजीचाही मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी अजीज खानला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.