आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वान होऊन जगत आहे ही व्यक्ती, या कारणामुळे घेतला हा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खऱ्या जीवनात श्वान म्हणुन जगणारी व्यक्ती तुम्ही कधीच पाहिली आहेत का? अशाच एका व्यक्तीचा आज आम्ही तुम्हाला परिचय करुन देणार आहोत. टॉम असे या व्यक्तीचे नाव असून ते आपल्या एक्स गर्लफेंडसमोर असे वर्तन करतो. तो बाऊलमध्ये जेवण करतो आणि हाताने चालतो. 

 

यामुळे झाला श्वान
- एका टीव्ही शोत टॉम आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड यांची मुलाखत झाली. या शोमध्ये टॉम श्वानाप्रमाणे जमिनीवर बसला होता. जेव्हा त्याला विचारण्यात आले की तु श्वान होऊन का जगत आहे. त्यावेळी त्याने आपण दगदगीच्या जीवनापासून आणि तणावापासून मुक्त राहण्यासाठी हे जीवन स्वीकारल्याचे सांगितले.

- काही काळ श्वान झाल्याने आपण ताजेतवाने होत असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर त्यांनी हे जीवन स्वीकारले.

 

अशा रितीने झाले होते ब्रेकअप
- टॉमची गर्लफ्रेंड रेचलला सुरुवातीला हे सगळे खूपच मजेदार वाटत होते. पण नंतर ती यामुळे त्रस्त होऊ लागली. टॉमने ह्यूमन पप नावाची एक कम्यूनिटी बनवली. त्यात अनेक जण सहभागी झाले. ते याला तणावमुक्त होण्याचे साधन म्हणून पाहत होते. रेचल मात्र या सगळ्यामुळे त्रस्त झाली व त्यांचे ब्रेकअप झाले. 

 

नंतर काय घडले?
- ब्रेकअपनंतर प्रदीर्घ काळाने टॉम सोबत रेचलला आपण चुकीचे वागल्याचे वाटू लागले. त्यानंतर ती टॉमला पुन्हा भेटली आणि त्याची माफी मागितली. त्यानंतर टॉम रेचलसोबत तिचा श्वान बनुन राहु लागला. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...