आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Masturbating In Front Of American Writer Is Arrested At Midnight

अमेरिकेच्या लेखिकेसमोर विकृत कृत्य करणा-याला मध्यरात्री कुलाब्यातून अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मरियाना यांनी केलेले ट्विट. - Divya Marathi
मरियाना यांनी केलेले ट्विट.
मुंबई - अमेरिकेच्या लेखिकेसमोर विकृत कृत्य करणाऱ्या व्यक्तीला मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी कुलाबा परिसरातून अटक केली आहे. गोपाल वाल्मिकी असे त्याचे नाव आहे. गोपाल कुलाबा परिसरातीलच राहणारा असून, त्याला ओळखणाऱ्या काही लोकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर अमेरिकेतील लेखिका मरियाना अब्दो यांनी ट्विटद्वारे या प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर या प्रकारावर सोशल मिडियातून बरीच टीका झाली. मुख्यमंत्र्यांनीही पोलिसांना या विकृत व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिस त्याला शोधण्यासाठी गस्त घालत होते. पोलिसांना कुलाबा परिसरातील काही लोकांनी फोटोतील त्या व्यक्तीला ओळखत असल्याची माहिती कळवली होती. त्या माहितीवरून पोलिस कुलाबा परिसरामध्ये गोपालचा शोध घेत होते. त्याचवेळी मंगळवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास कुलाब्यामध्ये पोलिसांनी गोपाल वाल्मिकी नावाच्या या व्यक्तीला अटक केली. पोलिस दुपारी 12 वाजेनंतर त्याला कोर्टात हजर करणार आहेत.

घडलेला प्रकार
अमेरिकेच्या प्रसिद्ध लेखिका मरियाना अब्दो भारतात पर्यटनासाठी आलेल्‍या आहेत. सोमवारी सकाळी 7.50 वाजता त्‍या मुंबईतील एका रस्‍त्‍यावर उभ्‍या होत्‍या. दरम्‍यान, एका तरुणाने त्‍यांच्‍याकडे पाहून विकृत कृत्य करायला सुरुवात केली. त्याचा किळसवाणा प्रकार पाहून मरियाना यांनी त्याला फटकारले आणि बाजूला असलेल्‍या दोन व्‍यक्‍तींना त्याची माहिती दिली. पण, त्‍या तरुणाने तत्‍काळ पळ काढला. मात्र, तो पळून जाण्‍यापूर्वी मारियाना यांनी त्‍याचा फोटो घेतला आणि ट्वीट केला.
मारियाना यांचे ट्वीट
Please RT-this man just masturbated at me on the street in broad daylight. Ran away after a confrontation. pic.twitter.com/VwzLndJvaw
— Maryanna Abdo (@MaryAbdo) August 17, 2015
हजारो रिट्वीट
मारियाना यांनी ट्वीट करून म्‍हटले, फोटोमध्‍ये समोर दिसत असलेल्‍या तरुणाने हस्‍तमैथुन केले असून, त्‍याच्‍या पाठोपाठ असलेल्‍या दोन व्‍यक्‍तींनी आपल्‍याला मदत केली आहे. आतापर्यंत त्‍यांच्‍या या ट्वीटला हजारो यूझर्सनी रिट्विट केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मरियाना यांनी ट्विट केलेल PHOTO