आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकलमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, कुर्ल्यातील आरोपी मजुराला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महालक्ष्मी ते लोअर परेलदरम्यान पीडित महिला डब्यात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर बलात्काराचा व ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोअर परेल स्थानकावर गाडी थांबल्यानंतर महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली. या वेळी प्रवाशांनी व पोलिसांनी आरोपी देवराज हनुमंत कानपा यास पकडले. तो कुर्ल्यातील मजूर असून त्याला न्यायालयात हजर केले असता 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडित महिला शनिवारी सकाळी पावणेसहा वाजता चर्च गेट स्थानकावरून चर्च गेट-बोरिवली लोकलमध्ये बसली होती. आरोपी महालक्ष्मी स्थानकावरून लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये घुसला. पीडित महिला एकटी असल्याचे पाहून त्याने विनयभंग करून बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला व मदतीसाठी मोबाइल फोन करत असताना त्याने तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली.


सुरक्षा जवानांचा अभाव
नियमानुसार महिला डब्यात सुरक्षा जवान असणे आवश्यक आहे. या लोकलमध्ये तो का नव्हता, या प्रश्नावर त्रिवेदी यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. लोकलमध्ये ज्या कॉन्स्टेबलची ड्यूटी होती, त्याला निलंबित करण्यात आले आहे. आरोपीवर याआधी चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे दाखल आहेत.