मुंबई- बहुचर्चित शीना बोरा हत्याकाडप्रकरणी सुरु चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शीनाही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी असल्याचे डीएनए चाचणीतून सिद्ध झाले आहे, अशी माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली आहे. दुसरीकडे मोठा खुलासा समोर आला आहे. तो म्हणजे, इंद्राणीला या हत्याकांडात मोठी सुटकेस आणि पेट्रोल पुरवणार्या दुकानदारांना 'प्राइम विटनेस' बनवण्यात येणार आहे.
पोलिस सूत्रांनुसार, इंद्राणीने या दुप्पट रक्कम देऊन 'मोठी सुटकेस खरेदी केली होती. पेट्रोल आणून दिले होते. या कामात मदत केली म्हणून इंद्राणीने दुकानदाराला मोठी टिपही दिली होती. शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह याच सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. नंतर त्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आला होता. दुकानदारांनी नोंदवलेल्या जबाबानुसार इंद्राणीवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध करण्यात येणार आहे.
सुटकेस विक्रेता दुकानदाराने सांगितले की, इंद्राणीने त्याच्याकडे मोठ्या सुटकेसची मागणी केली होती. दुकानदारासाठी हे मोठे डिल ठरले होते. कारण त्याला इंद्राणीने सुटकेसची दुप्पट किंमत दिली होती. त्यात दुकानदाराला मोठा नफा झाला होता. इंद्राणीने 700 रुपये किमतीच्या सुटकेसचे दुकानदाराला 1500 रुपये दिले होते. याशिवाय सुटकेस कारपर्यंत पोहोचवण्यासाठी 300 रुपयांची टीपही दिली होती. दुकानात इंद्राणी एकटीच आली होती. ड्रायव्हर श्याम बाहेर कारमध्येच होता.
पेट्रोल पंपावरी अटेंडेंटने सांगितले की, इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय याने हायवेवर असलेल्या पंपावरून कॅनमध्ये 10 लिटर पेट्रोल खरेदी केले होते.