आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेस नेते भाई जगताप यांच्या कन्येच्या रिसेप्शनला एकत्र दिसले उद्धव-राज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: कॉंग्रेस नेते भाई जगताप यांच्या मुलीच्या विवाहाच्या रिसेप्शनला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसले.)

मुंबई- कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांची कन्या आणि फॅशन डिझायनर मनाली जगताप हिच्या विवाहाच्या रिसेप्शनला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र दिसले. बॉलीवूडमधील किंगखान शाहरुख प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.

मनाली आणि विकी सूर या दोघांचा विवाह उदयपूर येथे झाला. नंतर मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्समध्ये रिसेप्शन झाले. या कार्यक्रमात राजकारणातील अनेक दिग्गजांसह बॉलीवूडमधील कलाकार उपस्थित होते. कॉंग्रेस कन्येच्या विवाहाच्या रिसेप्शनला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज ठाकरे सपत्नीक पोहोचले होते. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार मिलिंद देवडा, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यावेळी उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा; कॉंग्रेस नेत्याच्या कन्येच्या रिसेप्शनची फोटो...