आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटींसाठी दाभोलकरांची हत्या? मानवांवर सनातनचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सनातनकडून कोणालाही संमोहित करून गुन्ह्यासाठी प्रवृत्त केले जात नाही. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे श्याम मानव हे बदनामीसाठी असे आरोप करत आहेत, असे संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एखाद्याला संमोहित करून असे गुन्हे घडवून आणता येतात का, हे मानव यांनी सिद्ध करावे, अन्यथा माफी मागावी, असे आव्हानही त्यांनी दिले. सनातनचे साधक मानवी बॉम्ब असून त्यांच्या मनातून खुनाचा संस्कार काढूनही टाकला जातो, असे मानव यांनी म्हटले होते. सनातनवर बनारसच्या प्रीती व प्रिया चौरसिया यांच्या अपहरणाचा आरोप करत मुलींच्या पालकांनी सुटकेसाठी कोर्टात धाव घेतल्याच्या प्रश्नाचे उत्तर सनातनचे वकील संजय पुनाळेकर व वर्तक यांनी टाळले.
दोन कोटींसाठी दाभोलकरांची हत्या
श्याम मानव यांनी सनातनची बदनामी केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही सनातनने केली. दोन कोटी रुपयांसाठी दाभोलकरांची हत्या होऊ शकते, त्यात श्याम मानव हेही असावेत, असा गंभीर आरोप सनातनने केला. त्यावर या दोन कोटी रुपयांच्या निधीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मानव यांनी देत वर्तक यांच्या आरोपांचे खंडन केले.

पुढील स्‍लाइडवर वाचा,
1.श्‍याम मानव यांची सनातनबाबत 'सीएम'कडे तक्रार
2.'सनातनचे लक्ष्य हे 'ईश्वरी राज्य विरुद्ध सैतान'