आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेनेरिक औषधी देणे डाॅक्टरांना अनिवार्य; वैद्यकीय परिषदेच्या डॉक्टरांना सूचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉक्टरांनी यापुढे एखाद्या आजारावर ब्रँडेड औषधींसोबत जेनेरिक औषधीचे नावही लिहून देणे बंधनकारक असल्याची सूचना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली अाहे.     


अॅलाेपॅथीच्या ब्रँडेड व जेनेरिक अाैषधांच्या किमतीत खूप फरक असताे. मात्र, बहुतांश डाॅक्टरांकडून रुग्णांना ब्रँडेड अाैषधेच लिहून दिली जातात. त्यामुळे रुग्णांची लूट हाेत असते. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधाची जेनेरिक नावे वाचण्यास योग्य व कॅपिटल लेटरमध्ये नमूद करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ. दिलीप वांगे यांनी सांगितले आहे.

 

हृदय, कर्करोगासह अन्य ५१ औषधी स्वस्त
कर्करोग, हृदय, वेदना आणि त्वचारोगांशी संबंधित ५१ आैषधी स्वस्त करण्यात आल्या आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीने (एनपीपीए) या औषधींच्या किमती ६ ते ५३ टक्के कमी केल्या आहेत. वेगवेगळ्या अधिसूचनेद्वारा एनपीपीएने १३ औषधींचे कमाल विक्री मूल्य निश्चित केले असून १५ औषधींच्या किमतीत दुरुस्तीही केली आहे.

बातम्या आणखी आहेत...