आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःतले गुण हेरून काम करा, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळेल; मंगेश कांगणेंनी सांगितला यशाचा मंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रत्येकाने स्वत:मध्ये असलेले गुण हेरून काम केले तर त्याला पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळते असा सल्ला,  तरुणाईच्या मनातील प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेची टिक टिक ओळखून सूर निरागस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण गीतकार मंगेश कांगणे चित्रपटसृष्टीत येण्याचा विचार करणाऱ्या तरुणाईला दिला.

कवितेच्या वाटेवर या सत्रात आजवर 70 च्या आसपास मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिणारे गीतकार मंगेश कांगणे यांची उत्कृष्ट मुलाखत संतोष आंधळे यांनी घेतली. खरे तर ही मुलाखत नव्हतीच तर आपण मित्रांशी ज्या प्रकारे गप्पा मारतो अगदी तशाच पद्धतीने मंगेश उपस्थित श्रोत्यांशी मनापासून गप्पा मारत आपली वाटचाल उलगडून दाखवत होते. मध्ये मध्ये कविता आणि गाणीही म्हणून दाखवली.

दुनियादारीमधील टिक टिक वाजते डोक्यात या गीताने मंगेश कांगणे प्रचंड लोकप्रिय झाले. या गीताचा जन्म कसा झाला त्याची माहिती देताना मंगश कांगणे यांनी सांगितले, दुनियादारीसाठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी मला एक सिचुएशन सांगून प्रेम व्यक्त करणाऱ्या दोन ओळी लिहून देण्यास सांगितले. मी वेगवेगळ्या पद्धतीने चार-चार ओळी लिहून पाठवल्या. संजय जाधव यांना ओळी आवडल्या, त्यांनी त्या सिचुएशनवर गाणेच लिहिण्यास सांगितले. मला काही सुचत नव्हते. एक दिवस संध्याकाळी घरी बसलो असता माझा साडेतीन वर्षांचा मुलगा पत्नीकडे सतत फ्रीजमधील आंबा मागत होता. पत्नी सतत थोडा वेळ थांब म्हणत होती तेव्हा त्याने टिक टिक 1, टिक टिक 2 बोलायला सुरुवात केली आणि मला गाणे सुचले. मी ते लिहून काढले आणि रात्री संजय जाधव यांना ऐकवले आणि नंतर या गीताने इतिहास घडवला. यानंतर अशीच गाणी लिहिण्याच्या अॉफर मला आल्या परंतु त्या मी नाकारल्या.

गीत आणि कवितांमधील फरक समजावून सांगताना मंगेश कांगणे याने सांगितले, कविता मी माझ्यासाठी लिहितो तर गाणी मला दुसऱ्या व्यक्तीमत्वासाठी जनतेला आवडतील अशी लिहावी लागतात. त्यामुळे गाण्यांमध्ये रिदमसाठी हिंदी शब्दही टाकावे लागतात. कधी दिग्दर्शक सिचुएशन देतो, कधी आम्ही गाणे सुचवतो तर कधी चालीवर गाणे बसवावे लागते. कविता मात्र सुचली की लिहितो आणि ती गाण्यासारखी नसते. कवितेतही मी नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धेसाठी मी आईवर एक कविता लिहिली होती. परंतु ती सामान्य असल्याचे वाटल्याने वेश्येचा मुलगा आईबद्दल काय लिहिल याचा विचार करून कविता लिहिली ती सगळ्यांनाच आवडली.

गणपतीची गाणी सिनेमाच्या चालीवर लिहिणे वाईट नाही असे सांगून मंगेश कांगणे म्हणाले, चालीवरील भाव आणि शब्द महत्वाचे असतात. आम्ही तू चीज बडी है मस्त मस्त वर गणपतीचे गाणे बसवले होते, लोकांना ते खूपच आवडले कारण गाण्यातील शब्द आणि भाव भक्तीप्रद होते.

बातम्या आणखी आहेत...