आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mangesh Padgaonkar Awarded By Aachary Atre Puraskar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आचार्य अत्र्यांची शाबासकी अजूनही पाठीवर जाणवते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लेखक, समीक्षाकार, दिग्दर्शक, नेता, वक्ता असे अनेक कंगोरे लाभलेले एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेतच. त्यांच्या 115 व्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ कवी, पद्मभूषण मंगेश पाडगावकर यांचा ‘अत्रे सन्मान चिन्ह’ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी ‘लहानपणी माझी कविता आचार्य अत्र्यांच्या समीक्षा मासिकात पहिल्या पानावर छापून आली तेव्हा आचार्यांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप अजूनही जाणवते,’ या शब्दांत पाडगावकर यांनी भावना व्यक्त केल्या.

अत्रे यांच्या आठवणींना या कार्यक्रमात उजाळा देण्यात आला. पाडगावकर म्हणाले की, ‘मी शाळेत असताना आम्हाला आचार्य अत्र्यांनी संपादित केलेली मराठीची पुस्तके होती तेव्हा ती वाचण्याचा वेगळाच आनंद होता.

राजकारणी म्हणून अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व कसे वादळी होते याचे वर्णन करत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्याचे सार्मथ्य असलेला संपादक असे म्हणत अत्रेंचा गौरव केला. त्याचबरोबर अत्रेंना कधीही महापौर किंवा आमदार म्हणून महाराष्ट्राने का नाही स्वीकारले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रमुख अतिथी म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकर उपस्थित होते. पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या अत्रेंच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटात अवघ्या 10 वर्षांच्या हृदयनाथांनी ‘छडी लागे छम छम’ आणि ‘या रे या सृजन’ ही गाणी गायली.

हृदयनाथांकडून कौतुक
पुरस्कार मिळाल्याबद्दल हृदयनाथांनी पाडगावकरांचे कौतुक केले. अत्रेंच्या जयंतीचे औचित्य साधून अत्रे लिखित विनोद गाथा, शिरीष पै लिखित थोडे हायकू आणि अनिल दाभाडे लिखित विडंबन काव्यसंग्रह या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिरीष पै, राजेंद्र पै, पद्र्मशी पद्मजा फेणाणी जोगळेकर आदी उपस्थित होते. अशोक हांडे लिखित दिग्दर्शित अत्रे अत्रे सर्वत्रे या नृत्य नाट्य आणि गीतांच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता झाली.