आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी अधिकारी माणिक मुंडे शिवसेनेत जाणार, उमेदवारीच्या शब्दासाठी लांबला पक्षप्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय, प्रख्यात साहित्यिक आणि निवृत्त वरिष्ठ अधिकारी माणिक मुंडे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. खरे तर मंगळवारीच त्यांचा पक्षप्रवेश होणार होता, मात्र विधानसभा उमेदवारीबाबत अद्याप त्यांना शब्द देण्यात आल्याने त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला.

सेल्स टॅक्स विभागाचे सहआयुक्त म्हणून काम केलेल्या माणिक मुंडे यांनी मनपा उपायुक्त, सिडकोचे सीएओ, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणूनही काम केलेले आहे. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार, अभिमान सेतू सन्मान पुरस्कार, राजीव गांधी स्मृती सन्मानासह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मुंडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, नोकरीचा राजीनामा देऊन मी राजकारणात प्रवेश करत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होतो. मंगळवारी मी पक्षप्रवेशही करणार होतो, परंतु उमेदवारीबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने तूर्त मी प्रवेश केलेला नाही. येत्या चार दिवसांत पक्षप्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.’

‘गोपीनाथ मुंडे यांच्याशी चांगले संबंध असताना भाजपमध्ये न जाता शिवसेनेत का जात आहात,’ या प्रश्नावर मुंडे म्हणाले, शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष समानच आहेत.’